टीम महाराष्ट्र देशा : साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात.
खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठे भक्ष्यदेखील गिळू शकतात, यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते .आज आपण जगातील विषारी सापांबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये 278 जातीचे साप सापडतात.यापैकी फक्त 72 साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये 52 जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त 10 सापच विषारी आहेत.या 10 सापांपैकी मानवाचा फक्त 4 विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे 6 साप दूर्मिळ असून त्यातील 2 साप महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी तर 4 साप सह्याद्री पर्वतात सापडतात.
जगातील सर्वात विषारी साप हा इनलैंड तायपॅन हा आहे.त्या पाठोपाठ ईस्टर्न ब्राऊन , ब्ल्यू क्रेट, ब्लॅक मांबा हे आहेत. भारतामध्ये सर्वात विषारी साप हा (इंडियन क्रेट) मण्यार आणि (किंग कोब्रा) नागराज हे आहेत यांचे विष न्युरोटॉक्सीक तंत्रिका विषाक्त असते.
इनलँड तायपन हा जमिनीवर आढळणाऱ्या सापांमध्ये हा सर्वाधिक विषारी आहे. या सापाचे विष रॅटल स्नेकच्या तुलनेत १० पट तर कोब्राच्या तुलनेत ५० पट जास्त घातक आहे.ह्याच्या एका दंशामध्ये सुमारे शंभर मिलीग्राम विष असते. ह्याचे विष ‘रॅटल स्नेक’च्या विषापेक्षा दहापट आणि कोब्राच्या विषापेक्षा पन्नास पट अधिक विषारी आहे. हा साप मानवी वस्तीमध्ये सहसा आढळत नाही.
‘बेल्चर्स सी स्नेक’ ह्या जातीचा साप, दक्षिण-पूर्वी आशिया खंडामध्ये आणि उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये दिसतात. हा साप पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्वात विषारी सापांपैकी एक समजला जातो. तर इस्टर्न ब्राऊन स्नेक – हा साप ऑस्ट्रेलियात आढळतो. हा अतिशय विषारी असतो. याच्या विषाचा १४,००० वा भागही एखाद्या मनुष्याचे प्राण घेण्यास पुरेसा आहे.
मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.नाग (Cobra) याच विष हे अत्यंत घटक असल्याने, तो भारतातील ४ कुप्रसिद्ध सापांपैकी एक आहे. ज्यांना पहिल्या पहिल्या मारून टाकण्याचा प्रयत्न होतो. नागाला कित्येकदा घराभोवती शेतामध्ये पहिले जाते, उंदीर आणि इतर कुर्तडनाऱ्या प्राण्यान्मागे तो येतो, अचानक अडवले असता अगोदर तो फना काढून धमकी देतो परंतु, त्यावर पाय ठेवल्यास किव्वा इजा केल्यास तो डसतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

