नवी दिल्ली: महामार्गांवरून प्रवास करताना प्रवासात अडथळा आणि वेळ वाया घालवणारी गोष्ट म्हणजे टोल नाक्यांवर तोल भरावा लागणारा वेळ. त्यामुळे घाईमध्ये असणाऱ्या प्रवाशांना मोठा अडथळा निर्मान होतो. याच नाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी देखील होते. त्र आता हा अडथळा दूर होणार आहे. याबद्दल केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल,” असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. “पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी अ;ॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत असल्याची माहिती दिली. सर्व नवी वाहनं जीपीएस सिस्टमशी जोडले जातील असंही यावेळी त्यांनी सांगितलं. जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसंच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केलं आहे याचं मोजमाप करेल जेणे करून आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल. सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचं किंवा थांबवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे.
नितीन गडकरी यांनी चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता प्रवासातील हा अडथळा दूर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीच बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार


