🕒 1 min read
मुंबई : कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करित आहेत. यापुढील काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने व्यापक कार्य केले जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक श्री. धनंजय सावळकर उपस्थित होते. आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. यासंदर्भात वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊ, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अभेद्य काँग्रेससाठी मन व मतभेद संपवून एकजुटीने कामाला लागा – अमित देशमुख
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात नगण्य तरतूद, प्रितम मुंडेंचा घणाघात
- ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या – नितीन राऊत
- काँग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची कमतरता – धिरज देशमुख
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !


