Share

बीडमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होणार कमी; खाटांची माहिती पोर्टलवर होणार दर तासाला अपडेट

Published On: 

बीड: सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांची तसेच त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांची खूप धावपळ होते. मात्र आता ही होणारी धावपळ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी खाटांच्या उपलब्धतेची माहिती दर तासाला पोर्टलवर अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती नसल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होते. यात बराच वेळ जात असून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील खाटांची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना मिळावी, यासाठी हॉस्पिटलनिहाय खाटांच्या उपलब्धतेविषयीची माहिती पोर्टलवर दर एक तासाला अपडेट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेत.

जिल्ह्यातील फॅसिलिटी नोडल ऑफिसर तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जगताप यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, नातेवाइकांना हॉस्पिटलनिहाय खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती नसल्याने रुग्णाला दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यासाठी कोरोना बीड पोर्टल तयार केले आहे. त्यात प्रत्येक सुविधा नोडल कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दर तासाला बेड उपलब्धतेची माहिती पोर्टलवर अपडेट करावी, यात हलगर्जीपण केल्यास कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!