Share

क्रिकेट अकादमी होणार पण, मैदानाचे काय..? क्रिकेटप्रेमींचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी यांनी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. नुकतीच त्यांनी राज्याचे सार्वजनिक बाधंकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. पण या शहराचे वैभव असणारे गुरूगोविंदसिंघजी मैदानाचे काम कधी पुर्ण होणार असा सवाल शहरातील क्रिकेटप्रेमीनी केला आहे.

मागील दोन-तीन वर्षापासून या मैदानाचे काम रखडले आहे. केंद्र सरकारकडून ४२ कोटींचा निधी मनपाला मिळाला पण मनपाच्या उदासीनतेमुळे या मैदानाचे काम रखडले आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी अकादमी सुरू होईल, पण नवोदीत खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही तर सराव कुठे करणार असा सवाल येथील क्रिकेटप्रेमीनी केला आहे.

या मैदानाचे काम १९७७ मध्ये सुरु झाले होते. तब्बल १३ वर्षानंतर हे काम पुर्णत्वास गेले. या मैदानाची प्रेक्षक क्षमता ही ३०,००० इतकी आहे. २०१४ मध्ये भारतीय संघाचे माजी कप्तान दिलीप वेगंसकर यांनी या मैदानाला भेट दिली होती. हे मैदान अंतरराष्ट्रीय सामन्याच्या दृष्टीने विकसीत करण्याचे आश्वासन काँग्रेसने मनपा निवडणूकीदरम्यान दिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!