🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 70 वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अजूनही तळ ठोकून आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत आज हरियाणातील जिंद इथं महापंचायतीला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत. टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली.
हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी 50 खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन संपेल असे भविष्य वर्तविणाऱ्या महाभागांना ही चांगलीच चपराक असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे जिद मध्ये व्यासपीठ पण तुटले अन गर्दीचे सगळे रेकोर्ड पण तुटले. २०२१ हे युवक क्रांतीचे वर्ष असल्याची प्रतिक्रिया यानंतर राकेश टीकेत यांनी दिली आहे.
जींद में मंच भी टूटा भीड़ का रिकॉर्ड भी टूटा वर्ष 2021 युवा क्रांति का साल है।#किसान_आंदोलन_जारी_रहेगा #FarmersProtestDelhi2020 @OfficialBKU @PTI_News @BBCIndia @aren_anika @ANI @AHindinews @ndtvindia @brajeshlive pic.twitter.com/1MbFxbHAj3
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) February 3, 2021
तर, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत.
जींद कंडेला गाँव किसान महापंचायत !!#FarmerProtest pic.twitter.com/KejElyi8vq
— Amandeep Pillania (@APillania) February 3, 2021
महत्वाच्या बातम्या
- महापंचायत सुरु असताना राकेश टीकेत यांचे व्यासपीठ कोसळले !
- ‘वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या’; ग्रेटा थनबर्ग, रिहानाला परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले
- कोल्हापूरचा पठ्ठया आंतरराष्ट्रीय टॅक्सेशन परीक्षेत देशात अव्वल !
- ग्रामपंचायती झाल्या, आता नगरपंचायतच्या निवडणुकींची तयारी सुरू
- ‘ज्ञानेश्वर’च्या अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
