मुंबई : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा, प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका विदेशातही सातत्याने चर्चेत असते. तसेच प्रियांका आणि निक त्यांच्या पर्सनल लाइफमध्ये देखील चर्चेत असतात.सध्या सोशल मीडियावर निक-प्रियांकाचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र, या फोटोवरुन प्रियांकाचा हट्टापुढे निकला झुकावं लागल्याचं दिसून येत आहे.
सध्या निक -प्रियांकाच्या आगामी ‘टेक्स फॉर यू’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून हे चित्रीकरण झाल्यानंतर प्रियांकाने निककडे एक हट्ट केला आणि तो निकला पुरवावाच लागला. या प्रसंगाचे काही फोटो प्रियांकाच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आले आहेत. चित्रीकरणातून थोडा वेळ मिळाल्यानंतर निक-प्रियांका लंडनमध्ये फिरत होते. मात्र, अचानक प्रियांकाला फोटो काढण्याची लहर आली आणि तिने निककडे फोटो काढण्यासाठी हट्ट धरला. विशेष म्हणजे निकनेदेखील त्याच्या पत्नीचा हा हट्ट पूर्ण केला आणि भररस्त्यात तो प्रियांकासाठी फोटोग्राफर झाला.
लवकरच प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या या आगामी चित्रपटात निकदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूड पटात निक कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे. लंडनमध्ये निक आणि प्रियांकाला या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना पाहण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/CIpSrgiFGTB/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- येळकोट, येळकोट…जय मल्हार : खंडेरायाच्या जेजुरीगडाला आकर्षक रोषणाई!, पहा फोटो
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेट्रोचे काम होत आहे याची पोटदुखी भाजपाला झाली आहे’
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी


