Share

“जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं”, पंकजा मुंडेंनी साधला मविआवर निशाणा

Published On: 

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर नाराजी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेच दिसून आले. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या वरळीतील मार्स-1 या प्री-प्रायमरी शाळेच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी एसटी संपावरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. एसटीबाबत व्यवस्थित चर्चा झाली नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे हा वाद चिघळला असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “तपास यंत्रणा तपास करतील. मी फार बोलणार नाही. मुख्यमंत्री सभागृहात काय बोलले हे मी ऐकलं नाही”,

दरम्यान केंद्र सरकारच्या कामगिरीवर देशातील जनता खूष असून सरकारकडे मागण्या मागायचा संघटनांचा हक्क असतो. सरकार त्या नक्कीच पूर्ण करेल. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या लोकांची मी प्रतिनिधी आहे. तसेच सरकारने त्यांच्या पक्षातील लोकांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!