🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील घरगुती नळांना मीटर बसवले जाणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास तरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत नळांना जलमिटर लावण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, हे जलमिटर केवळ व्यावसायिक नळांनाच लावले जाणार आहे. तूर्तास तरी शहरातील घरगुती नळांना जलमिटर बसविले जाणार नाही.
औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नळांना जलमिटर बसविण्याच्या कामासाठी १३ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता लवकरच या कामाची निविदा देखील काढली जाणार आहे. याआधी समांतर जलवाहिनी प्रकल्पाची कंत्राटदार कंपनी एएमसीएलकडून शहरात नळांना जलमिटर बसविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे जलमिटर बसविण्याचा विषय मागे पडला.
आता नव्याने जलमिटर बसविण्याचा आणला गेला आहे. याविषयी पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीने केवळ व्यावसायिक नळांनाच जलमिटर बसविण्याचा तूर्तास निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. त्यात घरगुती नळांना जलमिटर बसविण्याच्या कामाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. व्यावसायिक नळांना जलमिटर बसविण्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीलाच सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुंबाला माजी मंत्री आ.संजय राठोड यांच्याकडून आर्थिक मदत
- मांसाहार प्रेमींनी करावा लागणार महागाईचा सामना; चिकन-मटणच्या दरात वाढ
- ‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं’, कांचन गिरींचा हल्लाबोल
- कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच
- ‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, उर्जामंत्र्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
