🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत या दोघांची सुमारे एक तास चर्चा झाली. त्यामुळे भाजपा आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणार का? या चर्चांना महाराष्ट्रात उधाण आलं. दरम्यान संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बेरीज महत्त्वाची आहे असं म्हटलंय.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, महाआघाडीला रोखण्यासाठी भाजपने एमआयएमबरोबरही जावे, असा टोला चव्हाण यांनी भाजपवर लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. फडणवीस यांच्या काळात एक-एका निर्णयाची आणि प्रकरणाची कठोर चौकशी केली जाईल.स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे, असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, भाजपा आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र आले तर यात भाजपाचेच नुकसान होईल असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी मांडले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत येणं हे भाजपासाठी हिताचं ठरणार नाही. जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यामध्ये त्याचं आणि त्यांच्या मनसे या पक्षाचं नुकसान आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते असं वाटत नाही, असे आठवले म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
