कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही.
अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासा संभाजीराजेंनी यावेळी केला आहे.
तर दुसरीकडे, ‘लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू’ असंही राजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून मी एकटा चर्चेसाठी मुंबईला जाणार नाही’ – खासदार संभाजीराजे
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवा भेटायला जाणार’ ; संभाजीराजेंची माहिती
- “मेरे रश्के कमर” या गाण्यामुळे सोनू कक्कर होतेय ट्रोल
- कसोटीचे महाभारत! सामना पधंरावा, अश्विनच्या अष्टपैलु खेळीमुळे भारताचे दमदार पुनरागमन; इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
