🕒 1 min read
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयं, आयटी कंपन्या, कॉर्पोरेट उद्योग अशा ठिकाणी होणारी रक्तदान शिबिरं हे रक्तसंकलनाचे स्रोत असतात, पण कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या यापैकी बहुतांश ठिकाणं बंद आहेत, शिवाय कोरोनाच्या भीतीमुळेही रक्तदानाचं प्रमाण कमी झालं आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातल्या रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतले घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हिल सर्जन या सर्वांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करून रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
राजकीय पदधिकारी यांनी राजकीय नेत्यांचे वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी नियमित रक्ताची गरज भासते. या रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असेही शिंगणे म्हणाले.राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्य आराखडा तयार करुन सर्व प्रयत्न करावेत, असे निर्देशही डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातल्या रक्तपेढ्यांकडे सध्या फक्त 35 हजार युनिट म्हणजे सरासरी 10 दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे, त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याचं संकट टाळण्यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषदेनं केलं आहे. राज्यातल्या रक्तपेढ्यांकडे किमान 20 ते 25 दिवस पुरेल इतका रक्तसाठा असणं सुरक्षित मानलं जातं. मात्र सध्या हा साठा 10 दिवसांपुरता असल्यानं नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असल्याचं राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉक्टर अरुण थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भरतीत घोटाळ्याच्या प्रकाश शेंडगेंच्या आरोपात 100 टक्के तथ्य- प्रविण दरेकर
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
