Share

‘काही भाजप नेते असे आहेत जे मोदी-शहा यांच्या राज्यात देखील खरे बोलतात’ भाजप नेत्याचा घरचा अहेर

Published On: 

नवी दिल्ली: सध्या देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पाडणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली असून विशेषतः पश्चिम बंगाल मध्ये मायावतींची सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम, केरळ या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान, दक्षिण भारतात भाजपला समर्थन नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपा नेत्यानंच ही कबुली दिलीय. केरळमध्ये 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. ‘केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे, पण येथील ज्येष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिलाय. केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत. असा घरचा आहेर त्यांनी भाजप ला दिला आहे.

यानंतर काँग्रेस नेत्यांनी राजगोपाल यांच्या वक्तव्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. लक्ष्य केलंय. शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र, माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात. यावेळी काँग्रेसनेही अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत, राजगोपल यांचं विधान शेअर केलंय. तसेच, फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असे काँग्रेसने म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!