🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशातील दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने अधिक सूट दिली आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा राज्यावर कायम आहे. काही मोजके जिल्हे वगळता उवर्रीत महाराष्ट्रात निर्बंध हे शिथिल केले जात असून आता जनजीवन सुरळीय होत आहे.
मात्र, अशातच राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे प्रमाण हे ३० हजारांहून अधिक झाल्यास तातडीने कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असं म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास करोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी भूमिकाच कुंटे यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना टास्क फोर्सची बैठक पार पडली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य कृती दलाचे डॉक्टर, आयसीएमआरचे तज्ज्ञ तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत ऍक्शन प्लॅनबाबत चर्चा झाली. यावेळी हॉटेल, लोकल प्रवासासाठीचे निर्बंधांबाबत देखील चर्चा झाली.
यानंतर सिताराम कुंटे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनेबाबत म्हणाले, ‘तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज बांधत आहेत, मात्र दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनचा वापर हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनची उपलब्धता आणि रुग्णसंख्या यांचे गणित निश्चित करून तात्काळ टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहाराला गती द्यावीच लागेल, मात्र करोनाची लाट आल्यास कोणताही उशीर वा चर्चेत वेळ न घालविता तात्काळ टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेताना राज्यात उपलब्ध असलेला ऑक्सिजनचा साठा नेमका किती रुग्णसंख्येला पुरणार आहे व किती रुग्णसंख्या झाल्यावर टाळेबंदी जाहीर करायची हे निश्चित करावे लागेल,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आज टास्क फोर्सच्या बैठकीत मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही मग खायचं काय?’
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
- ‘मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत हे आता कळले’
- ‘मंत्रालयात दारू ; ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची’- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
