जळगाव : हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत अभिनेत्री कंगना रानौतने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात, कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं होते, तर रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं होते. मात्र, यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले होते. मात्र आता कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला आहे. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर, तपासात कंगना रानौत पोलिसांना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल, असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. गेले २ दिवस अभिनेत्री कंगना रानौतला मुंबई पोलीस कोणत्याही अटक करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच निकम यांच्या या विधानामुळे अटक होण्याची शक्यता बळावली आहे.
मुंबई पोलिसांनी कंगणाला दोन वेळा समन्स बजावले, तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगणाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगणाने या समन्सचे उल्लंघन केलं तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलीस कंगणाला त्वरित अटकही करु शकतात. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगणाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करु शकतात, असं देखील ऍड. उज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण !
- ‘…तर भाजपने पब्लिक राड्यात सामील व्हावं’; भाजपच्या समर्थनावर नांदगावकरांची प्रतिक्रिया
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’


