यवतमाळ : पूजा चव्हाण प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित १ जुलै रोजी कृषी दिनापासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलैपर्यंत आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यात ‘घर, आंगण चंदन’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात किमान पाच हजार नागरिकांना चंदनाचे प्रत्येकी एक झाड देण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात चंदन वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यवतमाळ लगतच्या उमरठा, जामवाडी जंगलात एकेकाळी बरीच चंदन वृक्ष होती. जिल्ह्यातील चंदन वृक्षांचा हा ठेवा जपला जावा आणि प्रत्येक घरी एक तरी चंदनाचे झाड लावावे, या उद्देशाने संजय राठोड यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची रोपे वन विभागाकडून तयार करवून घेतली.
चंदनाच्या झाडाचे योग्य संगोपन आणि संवर्धन करून हे झाड वाढवल्यास ते पोक्त झाल्यानंतर त्यापासून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन घेता येईल, हा हेतू सुद्धा या उपक्रमामागे असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.
या अभियानात जो नाव नोंदणी करून चंदन वृक्ष संगोपन व संवर्धनाची हमी घेईल, त्यांनाच चंदनाची रोपे वितरित करण्यात येणार आहे. चंदनाच्या अध्यात्मिक, धार्मिक, औषधीयुक्त गुणधर्मासह त्याच्या सुवासामुळे वातावरण नेहमीच आनंददायी, आरोग्यदायी राहते. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन, सहकार्य करण्याचे आवाहन संजय राठोड यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलवरुन ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील वाद शिगेला, शेन वॉर्नने केले ‘हे’ वक्तव्य
- टी-२० विश्वचषक स्पर्धेबद्दल जय शाह यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले….
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- औरंगाबाद पालिकेचे पाऊल आधुनिकतेकडे, एकाच क्लिकवर औरंगाबादकरांना मिळणार सर्व सुविधा!
- मनपा आयुक्त शिवसेनेचे कि औरंगाबादचे?, सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळा अनावरणात काँग्रेसला डावलले!


