Share

‘गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेणार, गर्दी वाढल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार’

Published On: 

पुणे : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं असून राज्य सरकारने याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात नियमांमध्ये सूट द्यावी तसेच मंदिरे खुली करावीत अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

गणेशोत्सवाबाबत आणि निर्बंधांबाबत पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘पुण्यातील गणेशोत्सव हा मोठा असतो. राज्यासह जिल्ह्यातील भागातून नागरिक मोठ्या प्रमाणावर शहरातील देखावे पाहण्यासाठी येत असतात. अगदी पहाटेपर्यंत नागरिकांची गर्दी असते. यंदा मात्र देखावे नसल्याने अशी गर्दी होणे अपेक्षित नाहीये. सध्या तरी गणेशोत्सव काळात अधिक निर्बंध पुणेकरांवर लावले जाणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गर्दी वाढल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल,’ असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!