Share

…तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती; अमित शाह कडाडले

Published On: 

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, राणेंचे दोन्ही सुपुत्र- निलेश राणे व आमदार नितेश राणे हे यावेळी मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी भाषण करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. उद्धव ठाकरे हे खोटं बोलले आहेत. राज्यातील जनतेने भाजपला सर्वाधिक पसंत केलं आहे.’

शिवसेनेनं देखील निवडणुकांवेळी बॅनरवर नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करून फडणवीसांच्या नेतृत्वात मतं मागितली. यानंतर, त्यांनी पवित्र जनादेशाचा अनादर करून अपवित्र गठबंधन केलं. कुटील राजकारण यावेळी करण्यात आलं. आम्ही तुमच्या मार्गाने नाही चाललो. देवेंद्रभाई मुख्यमंत्री असताना त्याच मार्गाने आम्ही चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्वच राहिलं नसतं. आम्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र कल्याणाच्या मार्गाने चालतो,’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!