सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शाहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
या कार्यक्रमावेळी भाषणाची सुरुवात करतानाच अमित शाह यांनी शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मातीला स्पर्श केल्यानंतर खूप मोठ्या चेतनेची अनुभूती मिळते. कारण याच भूमीने देशाला स्वदेश आणि स्वधर्मासाठी जीव देण्याचा आणि घेण्याचा संस्कार दिला आहे. जेव्हा मुघलांचं, औरंगजेबाचं शासन होतं तेव्हा चहूबाजुंना आधार पसरला होता. तेव्हा युवा शिवाजी महाराजांनी देशाला स्वराज्याची चेतना दिली. तेव्हापासून ते आता मोदींच्या काळात भारताला विश्वगुरू बनवण्याची प्रक्रिया सुरु आहे,’ असं अमित शाह म्हणाले.
मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले – अमित शाह
‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


