सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, राणेंचे दोन्ही सुपुत्र- निलेश राणे व आमदार नितेश राणे हे यावेळी मंचावर उपस्थित होते.
या लोकापर्ण सोहळ्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचा उल्लेख महाराष्ट्रातील ‘दबंग नेते’ म्हणून ओळख असलेले नेते असा केला. यानंतर उपस्थितांनी देखील टाळ्यांचा प्रतिसाद दिला. तर, नारायण राणे हे पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करतात असं म्हणत त्यांचं कौतुक देखील केलं आहे.
पुढे नारायण राणेंनी यशाचं रहस्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ‘या कार्यक्रमात एक कमतरता आहे. या कॉलेजच्या अध्यक्षा खाली बसल्या आहेत. बाकी आपण सगळे वर बसलो आहोत. पण राणे साहेबांच्या यशामागचं रहस्य तेच आहे. वहिनी मागे राहून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहतात. त्यामुळे यशाची वेगवेगळे शिखरे राणे पादक्रांत करत असतात,’ असं म्हणत फडणवीसांनी राणेंच्या यशाचं श्रेय हे त्यांच्या पत्नीला दिलं आहे.
तर, ‘अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होता. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं म्हणत फडणवीसांनी राणेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- ‘महाराष्ट्राच्या भूमीत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या चेतनेची अनुभूती मिळते’
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


