Share

…तर पंड्याला खेळवा : सुनील गावसकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या २४ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध भारत तिसरा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा १७ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार असून, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. याशिवाय रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारास शुबमन गिल हे फलंदाज संघात कायम असून गोलंदाजांमध्ये आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज कायम आहेत.

यावरच इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याचा अंतिम संघात समावेश करण्यात यावा. तसेच जर तो गोलंदाजी करू शकत असेल तर त्याचा अतिरिक्‍त लाभ संघाला होईल, असा सल्ला विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिला आहे.

जर पंड्या गोलंदाजी करण्यास समर्थ असेल तर त्याला संघात स्थान देण्यात यायला हवे. तिसरा कसोटी सामना अहमदाबादला होत आहे. मोटेराची खेळपट्टी नवीन असल्याने तेथे कशाप्रकारची खेळपट्टी असेल हे सांगणे कठीण आहे. पण या सामन्यात विराट कोहलीने तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उरतावे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!