🕒 1 min read
नांदेड : कर्तव्यावर रुजू असताना धार्मिक कार्यक्रमात डीजेवर ठेका धरणाऱ्या हदगाव येथील पोलिस निरीक्षकावर तातडीची कारवाई पोलिस प्रशासनाने केली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी तातडीने संबधित पोलिस निरिक्षकाची बदली करुन कारवाई केली आहे.
नांदेड येथील पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे नुकतेच हदगाव पोलिस ठाण्यात प्रभारी आधिकारी म्हणून रुजू झाले होते. दरम्यान, हदगाव येथे १४ फेब्रुवारी रोजी राम मंदिर निधी संकलन अभियानाची समारोप मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी आहे, असे असतानाही उल्लंघन करून पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी वर्दीत असताना डीजेवर ठेका धरला होता. ठेका धरल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या ठेक्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस खात्याची बदनामी झाली, याप्रकरणी एमआयएमने त्यांच्या विरोधात कारवाई करवी अशा मागणीचे निवेदन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार आपल्या कर्तव्यात कसूर केलेल्या गायकवाड यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हनुमंत गायकवाड यांच्या जागी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण राख यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …पण तोच ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
- Breaking : आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण
- लसीचा पहिला डोस घेतलेल्या दोन डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग


