Share

…तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ग्रामपंचायतीत शिरकाव होईल- अण्णा हजारे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी बोली लावण्यात येत असल्याचेही समजले. मात्र, असे झाल्यास गुंड, भ्रष्टाचारी, व्याभिचारी प्रवृत्तीचे लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जातील अशी भीती व्यक्त करतानाच मतदारांच्या संमतीने निवडणुका बिनविरोध करणे हा उत्तम पर्याय असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

देशात लोकशाही यावी, यासाठी नव्वद वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची, असे त्यांचे स्वप्न होते. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!