Share

कारवाई तर होणारच; न्यायालयाने फेटाळली कंगनाची याचिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. कंगनाने  तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाने कंगनाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकते असा निकाल दिला होता. या निकालाला कंगनाने आव्हान देत पालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. कंगनाची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे.

वांद्रे येथील बेकायदा बांधकामानंतर कंगनाने खार येथील फ्लॅट मध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले होते. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात सूट दाखल केली. मात्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी कंगनाला दिलासा देण्यास नकार देत सूट फेटाळून लावले.

एवढेच नव्हे तर सहा आठवडय़ांत पालिकेच्या नोटीसीवर हायकोर्टाकडून स्थगिती आणली नाही तर पालिकेला कारवाईपासून कोणीही रोखू शकत नाही असे तिला बजावले होते. खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीज इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट असून हे तीनही फ्लॅट तिने एकत्र केले होते. 50 टक्क्यांपेक्षा अतिरिक्त बांधकाम तसेच मुख्य स्ट्रक्चर मध्ये फेरफार केल्याने पालिकेने कंगनाला 26 मार्च 2018 रोजी नोटीस बजावली होती.

दरम्यान,या याचिकेवर न्यायाधीश एल एस चव्हाण यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने बाजू मांडणाऱया वकिलांनी कोर्टाला सांगितले की कंगनाने पालिकेची परवानगी न घेता फ्लॅटमध्ये फेरफार केले आहेत. ओसी प्लॅन मध्ये बरेच बदल केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत न्यायधीशांनी पालिकेचा दावा मान्य केला व कंगनाने दाखल केलेले सूट फेटाळून लावत या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागण्यासाठी तिला सहा आठवडय़ांची मुदत दिली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!