Share

‘..तर डोक्यावरचे अर्धे केस काढेन’; शिल्पाने ‘त्या’ हेअरकटबद्दल केला खुलासा

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच हेअर कटबद्दल तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, हे पाहून चाहत्यांना मात्र धक्का बसला होता. तिने असे का केले, याबद्दल तिने नुकताच खुलासा केला आहे. शिल्पाचा डोक्यावरील अर्धे केस काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत होता.

शिल्पाचा पतीला राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे शिल्पा काही दिवस सर्वांपासून लांब होती. त्यानंतर ती पुन्हा रिअॅलिटी शोमध्ये दिसू लागली. पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा वैष्णोदेवी दर्शनाला गेली होती. आता शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये शिल्पाने डोक्यावरचे अर्धे केस काढले आहेत. शिल्पाने असे का केले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या मागचे कारण समोर आले आहे. एका वृत्तानुसार, शिल्पाने वैष्णोदेवीला जाऊन नवस केला होता की जर पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला तर डोक्यावरचे अर्धे केस काढेन. त्यामुळे पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाने डोक्यावरचे अर्धे केस काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘अंडरकट बझ कट’ केल्याचे सांगितले आहे.

https://www.instagram.com/reel/CVK2pUVDUfu/?utm_source=ig_web_copy_link

केस बांधत असतानाच शिल्पाने नवा हेअरकट केल्याचे म्हटले जात होते. मात्र डोक्यावरील अर्धे केस काढण्यामागचे कारण आता समोर आले आहे. काही नेटकऱ्यांनी शिल्पाचा हा व्हिडीओ पाहून तिचं कौतुक केले होते तर काहींनी मात्र कमेंट करत तिची थट्टा केली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!