टीम महाराष्ट्र देशा :२०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. भाजपने अभूतपूर्व यश मिळवत सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेसचे नेते राजीनामा देत आहेत.
शनिवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा सादर केला होता परंतु त्यांचा राजीनामा फेटाळला होता. अशातच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, असे केल्याने दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील असे ते म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. तसेच त्यांना पदावर कायम राहण्याची विनंती वरिष्ठांनी केली आहे. या निवडणुकीत देशात काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या आहेत तर बहुतांशी राज्यात काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. तसेच महाराष्ट्रात कॉंग्रेसला फक्त १ जागा मिळाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

