🕒 1 min read
इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (डब्ल्यूटीसी) मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर योग्य खेळाडू आणली जातील जे योग्य प्रदर्शन करण्यासाठी योग्य मानसिकतेसह येतील. डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. कोहलीने कोणतीही नावे घेतली नाहीत, परंतु म्हणाला की, काही खेळाडू धावा करण्यात रस दाखवत नाहीयेत.
आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहेत. इंग्लंडविरूद्ध विराट कोहली तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल करण्याचा विचार संघ व्यवस्थापन गांभीर्याने करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन दिग्गज खेळाडूंवर टांगती तलवार आहे. पुजारा कसोटी संघातून बाहेर पडल्यास तिसर्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करताना दिसू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याचंही स्थान संघात निश्चित नाही. अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीमुळे इतर फलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ते’ ३ कोटी अनिल देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले; EDचा खुलासा
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- ‘भाजपशी जुळवून घेतल्यावर सरनाईक सारख्यांचा त्रास कमी होईल याची खात्री काय?’
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘ते’ ३ कोटी अनिल देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले; EDचा खुलासा

