Share

उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, मात्र ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे, राज्यशासनानं जारी केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरात घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे. यानुसार, येत्या शुक्रवारपासुन शहरातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार आहे. नाट्यगृहांपाठोपाठ बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. तथापि, आसन क्षमता पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली असून, कलाकारांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची अट घालण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, नाटकाशी निगडीत घटक वगळता कोणालाही रंगमंचावर जाण्याची अथवा कलाकारांना भेटण्याची परवानगी नसेल. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करताना कोविड प्रतिबंधक उपापयोजना बंधनकारक असल्याचं पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल सांगितलं. ही शिथिलता देतानाच, प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!