Share

१०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली.

लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले. येथे रुग्णालय अधिकाऱ्यांशी संवाद साधल्या नंतर त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनच्या विश्राम सदनाच्या उद्घाटन प्रसंगी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’२१ ऑक्टोबर २०२१ चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने काही वेळापूर्वीच १०० कोटींच्या लसीचा टप्पा पार केला आहे. १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीचे मजबूत सुरक्षा कवच आहे. ही कामगिरी भारताची आहे. देशाच्या लसनिर्मिती करणाऱ्या, पुरवठा करणाऱ्या आणि लस देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. काहीवेळापूर्वी मी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील व्हॅक्सीन सेंटरला भेट देऊन आलो. उत्साह आहे आणि जबाबदारीची भावना देखील आहे की आपण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत केले पाहिजे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. तसेच १०० कोटी लसींच्या डोसचे हे यश मी प्रत्येक देशवासियांना समर्पित करतो,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलतांना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे कौतुक करत ते म्हणाले की,’मी मनोहर लालजींना बऱ्याच काळापासून ओळखतो, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिभा समोर आली आहे. मनोहर लाल अनेकदा चांगले प्रयोग करतात. कधीकधी केंद्र सरकारला असेही वाटते की आपणही असे प्रयोग केले पाहिजेत. मनोहर लाल खट्टर यांनी दीर्घ विचाराने घातलेला पाया हरियाणाच्या विकासासाठी खूप प्रभावी ठरणार आहे,’ असे मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!