औरंगाबाद: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराच्या कामाचे खाजगीकरण करण्याचा घाट औरंगाबाद महापालिकेने घातला आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी औरंगाबाद महानगरपालिकेत प्रशासकांना निवेदन दिले. खासगीकरणाचा हा निर्णय मनपा प्रशासनाने त्वरित रद्द करावा अन्यथा मनसेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच जे काम २ ते ३ कोटींमध्ये होऊ शकले असते त्या कामावर मनपाने ८ कोटींचा खर्च कसा केला? असा प्रश्नही यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर(Sumit Khambekar) यांनी उपस्थित केला.
महानगरपालिका प्रशासनाने संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी सोमवारी (दि.१७) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मनपाने निर्णय मागे न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला. गेल्या चार वर्षापासून संत एकनाथ रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी मनपाने ८.५० कोटी रूपये खर्च केले. दोन वर्षात होणाऱ्या कामाल एकूण ४ वर्ष लागले. तरीदेखील नागरिक व कलाकारांनी ते सहन केले.
आता रंगमंदिराच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असतांना अचानक मनपाने रंगमंदिराच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला. जो सर्वानाचा धक्का देणारा आहे. मुळात जर खाजगीरकरण करायचे होते तर ८ कोटी रूपये खर्च करण्याची आवश्यकताच काय होती? अगोदरच बीओटी तत्त्वावर स्वत: चे उत्पन्न ठरवून त्याच वेळेस ते कोणाला दिले असते तर चालले असते. आता खाजगीकरण करणे म्हणजे नागरिक व कलावंतांची एकप्रकारे लूटच आहे. असे मनसेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
शहराचा विकास रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी; आमदार बंब यांचे प्रतिपादन!
‘यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’; रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका
मी निष्ठा आणि प्रामाणिकपणा सोडला नाही; त्याचेच आज फळ मिळाले-खा. भागवत कराड
औरंगाबादेतील पहिल्या ओमायक्रोनबाधित रुग्णाने मानले मनपाचे आभार; म्हणाला….
‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला’; मुख्यमंत्र्यांकडून एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

