औरंगाबाद: महापालिकेच्या आरोग्य अधिकारी, एएनएम, नर्सेस, वॉर रूम मधील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनेक वेळा ओमायक्रोनबाधित परिवार सदस्यांशी संपर्क साधला, त्यांची काळजी घेतली आणि सतत सर्वेक्षण देखील केले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे, त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांनी मनपा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कोरोनानंतर आलेले नवे संकट म्हणजे ओमायक्रॉन. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णांचा समावेश असल्याने औरंगाबाद प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरांमध्ये रहिवासी राहत असलेल्या भागातील रहिवाशांना सदर रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.
नुकताच एका बाधित परिवारांशी संबंधित एका सदस्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी संपर्क साधून औरंगाबाद महापालिकेच्या टीमने ज्या पद्धतीने त्यांच्या परिवाराची काळजी घेतली आणि सतत संपर्कात राहिले त्याबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. रुग्णाच्या घरातील सदस्यांनी मनपा प्रशासनाची प्रशंसा करत आभार मानले आहेत. केंद्रेकर यांनी देखील मनपा प्रशासक आणि सर्व टीमचे अभिनंदन केले. संबंधित व्यक्तीच्या परिवारात फक्त एक जण Omicron बाधित आढळून आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
किरण मानेंची सहकलाकारांशी चांगलीच वागणूक, सेटवरील महिला कलाकारांचा पाठिंबा
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
“इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळी…”; किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात


