Share

जाणून घ्या रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्याचं नेमकं का होतंय कौतुक ?

Published On: 

🕒 1 min read

विवेक पोटफोडे/रायगड : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक आपल्या घरापासून लांब इतर शहरात अडकले आहेत. या सर्व नागिराकांना पुन्हा घरी पोहोचवण्यासाठी सरकारकडून परवाना दिला जात आहे. हा परवाना मिळवण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करत आहेत. त्यामुळे रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी त्यांच्या कल्पनेतून एक पोर्टल तयार केले. या पोर्टलच्या माध्यमातून ते प्रवास परवाना देत आहेत. याच पोर्टलचा फायदा आता संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे काम सुसह्य झाले आहे.

प्रवास परवाना मिळवण्यासाठी पोर्टल तयार केल्याने याचा फायदा नागरिकांनाही झाला आहे. रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर हे पोलीस प्रशासनात काम करताना नेहमी लोकोपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना राबविण्यात आघाडीवर आहेत. पारसकर यांनी हे पोर्टल केवळ रायगड जिल्ह्यापूर्ती तयार केले होते.

केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय ; अमोल कोल्हे यांचा थेट मोदी सरकारवर हल्लाबोल

पोर्टल तयार केल्यानंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसानंतर या पोर्टलची उपयोगिता राज्याचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांच्या कानावर आली. त्यानंतर भारंबे यांनी हे पोर्टल पाहिले आणि राज्यभर हे पोर्टल वापरण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 28 मार्चपासून http://covid19.mhpolice.in या पोर्टलचा राज्य पातळीवर उपयोग सुरू करण्यात आला.

या पोर्टलवर परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने परवान्यासाठी अर्ज करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवासाचा परवाना मागण्यासाठी पोलिसांकडे राज्यातून आतापर्यंत तब्बल 20 लाख 84 हजार अर्ज आले आहेत. यापैकी 5 लाख 42 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत प्रवास परवाना दिला आहे.

साखर कारखानदारी समोरील अडचणींत वाढ, शासनाच्या मदतीची गरज- घाटगे

गेल्या 12 एप्रिल ते 12 मे या एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यातून 98 लाख 17 हजार नागरिकांनी या पोर्टलला भेट दिली. रोज जवळपास चाळीस ते पन्नास हजार अर्ज येऊ लागले आहेत. अत्यंत आणीबाणीच्या काळात पारसकर यांनी तयार केलेल्या या पोर्टलमुळे पोलीस प्रशासनाचे काम सुसह्य होण्यास मदत झाली आहे.

केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय ; अमोल कोल्हे यांचा थेट मोदी सरकारवर हल्लाबोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!