कागल/ प्रतिनिधी : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्याअनुषंगाने साखर कारखानदारी ही अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी मुख्य केंद्रबिंदु असणारी ही साखर कारखानदारी टिकवण्यासाठी आता शासनाच्या मदतीची गरज आहे.असे स्पष्ट मत कागलच्या शाहू कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.मुलाखतकार पंडित कंदले यांनी कोरोना पशवभूमीवर त्यांच्याशी फेसबुक अँपद्वारे विविध विषयांवर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महापुरानंतर कोरोनाच्या सलग आलेल्या दुसऱ्या मोठ्या संकटामुळे साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. कारखानदारीचे आर्थिक गणितच बिघडले आहे. साखर , इथेनॉल विक्री ठप्प झाली आहे. व्याजाचा बोजा वाढत आहे.सरकार कडून साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉक अनुदान, व्याज परतावा, सहवीज प्रकल्पांची वीज बिले थकीत आहेत. त्यामुळे धोक्यात असलेली साखर कारखानदारी वाचविण्यासाठी आता सरकारकडून ठोस उपाययोजनांची गरज आहे .त्यासाठी सरकारकडून येणे असलेली रक्कम कारखान्यांना त्वरित मिळणे आवश्यक आहे. कारखान्याच्या सर्व कर्जांचे पुनर्गठन करणे, कमी व्याजाच्या कर्जाचे पॅकेज देणे,साखर निर्यात धोरण कायम ठेवणे, तसेच सॅनिटायझर निर्यातीसाठी परवानगीसह ते एक फिक्स दराने शासनाने खरेदी करून कारखानदारी ला उभारी देणे आवश्यक आहे. असेही उपाय ही त्यानंI सुचवले.
रिअल इस्टेट उद्योगावर सुद्धा या मंदीचा परिणाम झाला आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले, या उद्योगाला सावरण्यासाठी सुद्धा शासनाने स्टॅम्प ड्युटी सरसकट कमी करनेबाबत विचार केला पाहिजे तसेच ,कामगार कल्याण निधीत तात्पुरती सूट देण्याबरोबरच रेरा प्राधिकरणामार्फत सवलती दिल्या पाहजेत, लोकल बॉडी टॅक्स कमी करण्याबाबत विचार व्हावा .ई फायलिंग फॅसिलिटी सरसकट करावी. अशी मागणी सुद्धा त्यांनी केली .
प्रचलित शिक्षण प्रणालीवर सुद्धा कोरोना व्हायराचा मोठा परिणाम होणार असून शिक्षण प्रणालीमध्ये सुसुत्रता आणणेसाठी शासनाने धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे.त्यासाठी इ लर्निंग पद्धतीचा पर्याय पुढे येईल,त्यामुळे व्हिडीओ लेक्चर, ऑनलाईन प्रवेश इत्यादी बाबी आल्याचं पण इ लर्निंग चा बॅलन्ससड वापर अपेक्षित आहे .
आत्मनिर्भर पॅकेज बाबत ते म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीतील आर्थिक व्यवस्थेला उभारी देण्यासाठी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या मेगा पॅकेजमुळे थांबलेले उद्योग चक्र पुर्ववत फिरेल.स्वदेशीच्या आवाहनामुळे मेक इन इंडीया, मेक इन महाराष्ट्रसह मेक इन कोल्हापूर संकल्पनेस चालना मिळेल.कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे जाहीर केलेल्या या पॅकेजला राजकीय व्हायरसची लागण होऊ न देता राज्य शासनानेही एखादे पॅकेज देऊन स्थानिक युवक,महिलांसह उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावावा असे मत त्यांनी व्यक्त केले .
कोरोना आपत्ती …नव्हे …! स्थानिकांना संधी..
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परप्रांतीय मजूर मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे ते ज्या ठिकाणी कामावर होते. त्या जागी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासणार आहेत. ते करत असलेले व्यवसाय सुद्धा बंदच आहेत. आता स्थानिक नागरिकांनी या रोजगाराच्या संधी आहे त्या संधीचा फायदा उठवणे आवश्यक आहे. एकंदरीत कोरोना आपत्ती स्थानिक नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.त्याचा स्थानिकानी लाभ उठवला पाहिजे
दादांनी दिला शब्द : आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधी कमी पडू देणार नाही
कोरोना योद्धेच रियल हिरो…!
गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीत ग्रामीण भागात विविध आघाड्यांवर उपल्बध साधनांनिशी विविध घटक कोरोनाला थोपविण्यासाठी यशस्वीपणे लढत आहेत.याचे खरे श्रेय डॉक्टर्स,पोलीस अधिकारी त्यांचा स्टाफ आरोग्य विभाग ,महसूल,ग्रामपंचायत , शिक्षण , बँका,महावितरण विभागाकडील अधिकारी -कर्मचारी,दक्षता समित्या, अशा सेविका माजी सैनिक स्वयंसेवक आदीसह सर्व समावेशक घटक ,या कोरोना योद्ध्यांच्या सेवा भावी वृत्तीसह त्यांच्या धाडसाला मी सलाम करतो.कारण तेच रियलहीरो आहेत.असा त्यांचा कृतज्ञता पुर्वक उल्लेख घाटगे यांनी केला.
#corona : टी-20 वर्ल्डकप लांबणीवर टाकला तर IPL होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

