🕒 1 min read
मुंबई : जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर केंद्राबरोबर राज्य सरकार पण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याला कारणीभूत ठाकरे सरकार आसल्याच अनेकांनी म्हटल, पण आता राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हणाले , “केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये एक धरसोडवृत्ती पाहायला मिळतेय. मागच्या लॉकडाऊनमध्ये दोन-अडीच दिवसांनंतर एक नवीन सूचना येत होती. दर दोन दिवसांनी जेव्हा सूचना बदलायला सुरुवात होते, तेव्हा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये गोंधळ उडतो, असं म्हणत कोल्हेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मोदी सरकार हूकूमशाही पद्धतीनं सत्तेच्या अहंकारात मदमस्त- सोनिया गांधी
पुढे ते म्हणाले , पहिला लॉकडाऊन झाला, त्यावेळी आपल्याकडे ५०० ते ५५० एवढेच रुग्ण होते. पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा आपण १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा आपण जवळपास २५ ते ३० हजारांचा टप्पा ओलांडला होता. आजच आपण ७५ हजारांच्या घरात आहोत आणि १७ तारखेपर्यंत कदाचित आपण ८० हजारांचा टप्पा ओलांडू, असा अंदाज वाटतोय.
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा देशपातळीवर तो कशा पद्धतीनं पूर्ण झालाय, यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण आहे. जर्मनी दर १० लाखांच्या मागे २५ हजार चाचण्या घेतंय, न्यूझीलंड २२ हजार चाचण्या करतंय. पेरूसारखा देश ५ हजार टेस्टिंग करतोय. तिथे भारताचं टेस्टिंग हे ५०० ते ६००च्या दरम्यान आहे. ८० हजारांच्या घरात पोहोचल्यानंतर मजुरांना त्यांच्या राज्यांत पाठवण्यासाठी ट्रेन आणि सुरू करतोय, मग आपल्या पॉलिसीमध्ये गडबड झाली की नाही हे शोधावं लागेल. असा सवाल त्यानी विचारला आहे.
नीरव मोदीच्या कंपनीशी काँग्रेस नेत्यांचा संबंध- भाजपाचा आरोप
सुस्पष्ट धोरणाचा अद्यापही अभाव आहे. स्वदेशी, लोकलवोकल या पंतप्रधानांच्या आवाहनांचं मी नक्कीच स्वागत करतो. पण हे सगळं कागदावर न राहता सर्वसामान्यांना त्याचा काय फरक पडणार आहे हे जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला समजत नाही. तोपर्यंत त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. लॉकडाऊन आणि टेस्टिंगच्या बाबतीत महाराष्ट्र आज अव्वल नंबरला आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र आज अव्वल नंबरला आहे. असं असतानाही केंद्राकडून सातत्यानं होणारे बदल आणि गाइडलाइनमध्ये सुस्पष्टता नसल्यामुळे हा संभ्रम निर्माण होतोय. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चांगलं काम करतंय, असं म्हणत सरकार अस्थिर करणाऱ्यांनाही त्यांनी चपराक लगावली आहे.
‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
