🕒 1 min read
बीड : पूजा चव्हाण आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतरही हे पेल्यातील वादळ शमण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडत आहे. पूजाच्या आईवडिलांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका असे सांगितले होते. यावरूनच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दुसऱ्याच दिवशी पूजाच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा दावा शांताबाई यांनी केला होताय
त्यामुळे संतप्त होऊन पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत. त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी पूजा आणि आमच्याबद्दल अफवा पसरवून बदनामी करत आहेत. शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा पुजाशी काहीही संबंध नसताना त्या या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतले असे वक्तव्य करत आहेत. त्यांचे सर्व आरोप खोटे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
काय म्हणाल्या होत्या शांताबाई ?
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाईल. सामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो. पण, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही. हे वाईट आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- डीसीसीतील भाजपच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली
- अवैध वाळू विरोधात आ.पवारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
- ‘राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे राजकारण स्वार्थी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
