Share

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ केला. शहरात आजवर ११ हजार १८१ अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात आली आहे. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस सोमवारी (दि. १५) पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना दिली.

शहरात पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणासाठी २४ हजार आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली. पूणे येथील सिरम कंपनीकडून कोविशिल्ड लसीचे डोस पुरविण्यात आल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३७२ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला. त्यानंतर आरोग्य विभागाने लसीकरणासाठी चार दिवस ठरवून दिले. शहरात पालिकेने लसीकरणासाठी धूत, बजाज, हेडगेवार, एमजीएम, मेडीकोव्हर या पाच रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु केले.

आरोग्य अधिकारी-कर्मचार्‍यांचे लसीकरण सुरू असताना आरोग्य विभागाकडून कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणारे पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोना लसीचा डोस देण्यास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात सुरुवात झाली आहे.

आता कोरोना लसीकरण सूरू होऊन एक महिना पूर्ण होत आहे. या महिनाभरात शहरात ११ हजार १८१ जणांना लसीचा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये ९ हजार ८८७ आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. तसेच १२९४ फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिली आहे. नियमाने या कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागणार असल्यामुळे २८ दिवसाच्या अंतराने लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!