औरंगाबाद : प्रवाशांची विशेषतः विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन औरंगपुरा ते शिवाजीनगरकडे जाणाऱ्या स्मार्ट सिटी बसेस आता नाईकनगर पर्यंत धावणार आहेत. या निर्णयामुळे शेकडो प्रवाशी, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर ब्रेकनंतर सिटी बस सेवा नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि वैशिष्ट्यासोबत सुरू करण्यात आली. अँड्रॉइडद्वारे संचलित ई-तिकिट सिस्टिम, प्रवाशांना मासिक पासेसची सुविधा देण्यात आली. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्मार्ट सिटी बसेसला मिळत आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) औरंगपुरा ते शिवाजीनगर पर्यंत बस चालवित होती. नाईकनगर पर्यंत सिटी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशी, विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीनुसार नव्या वेळापत्रकानुसार शिवाजीनगर येथे पूर्वी संपणाऱ्या मार्गाचे बीड बायपास ओलांडून नाईकनगर पर्यंत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुकूंदवाडी ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ते मुकूंदवाडी मार्गावरही हा बदल करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी बस आता नाईकनगर पर्यंत जाईल आणि नाईक नगर येथून सुरू होईल. स्मार्ट सिटी बस विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सिध्दार्थ बनसोड म्हणाले की, नाईकनगर जवळ बीडबायपासच्या पुढे राहणाऱ्या विद्यार्थी व रहिवाशांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार हवेत, जनता ‘गॅस’वर! घरगुती गॅस ५० रुपयांनी महागला
- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरुवात
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- इच्छुक उमेदवारांची वॉर्डा-वॉर्डातल्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धाव
- दुख:दायक! लग्नाला जाणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला


