औरंंगाबाद : विधवेसोबत प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवत जालन्यातील तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हबीब महेबुब शेख (वय ३१, रा. गणपती नेत्रालयाजवळ, जालना) असे त्याचे नाव आहे.त्याच्याविरुध्द नवी मुंबई वाशी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एका २८ वर्षीय पिडीतेचे २००९ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात म्हणजे २०११ मध्ये पीडितेच्या पतीचे निधन झाले. तिला सध्या एक आठ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, शिक्षणानिमित्त पिडीता सन २०१९ मध्ये औरंगाबादेत आली होती.
तेव्हा तिची मुकुंदवाडी भागात हबीब शेख याच्याशी ओळख झाली. हबीबने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने सिडको बसस्थानक परिसरातील लॉज, वाशी, नेरुळ येथे अत्याचार केला. याचवेळी तिचे छायाचित्र काढण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
