मुंबई : गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघाचं दार ठोठावनारा सुर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धडाकेबाज कामगिरी केली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमारची भारतीय संघात नक्कीच निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सूर्यकुमारची एकदिवसीय, टी 20 किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नव्हती.
मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिलेली आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखीलया मालिकेत संधी दिलेली आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, शिखर धवन, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक , रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, वाय. चहल, वरुण चक्रवर्थ्य, अक्षर पटेल, डब्लू . सुंदर , आर. तेवतीया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाचा पदाधिकारी झाल्यानंतर बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?
- कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
- सातारा-देवळाई कोरोना हॉटस्पॉट?
- ‘तेंव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती’
- ‘भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

