Share

‘कलम ३७० आणि पाकिस्तान हा मुद्दा निवडणुकीत वापरल्यानेचं मतदानाची टक्केवारी घसरली’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यात एका टप्यात मतदान झाले. यावेळी राज्यातील शहरी भागात मतदानाचा टक्का घसरताना दिसला. मात्र शहरी भागात मतदानाचा टक्का का घसरत आहे ? याबाबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी याचे खापर भाजपवर फोडले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370 आणि राष्ट्रीय मुद्यांचा वापर केल्याने मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे, असे खळबळजनक विधान राऊत यांनी केले आहे.

ते म्हणाले की, पाकिस्तानविषयी केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे लोकांना आधीपासूनच ठाऊक आहे. या मुद्द्यावरून जनतेने लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान केले. तसेच राम मंदिराचा प्रश्नही लोकसभेच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. तेव्हा याच मतदारांनी शिवसेना- भाजपला मते दिली.

त्यामुळे लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांतील प्रचाराचे मुद्दे हे वेगळे असायला हवेत. तुम्ही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावरून बोलायला लागलात, तर कसे होईल? विधानसभा निवडणुकीत रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, त्याऐवजी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. यामुळे नागरिकांमध्ये नैराश्य आले आहे का? त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे का?, या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1186946533003939845?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1186946500707774464?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!