Share

पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

यामध्येच जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने देखील शेतकऱ्यांना पाठींबा देणारे शेतकऱ्यांविषयी ट्विट केलं होतं. ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं ट्विट रिहानाने केलं होतं. सोबतच तिने ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला होता. यावर देशातून वेगवेगळी प्रतिउत्तर देण्यात येत आहे. यामध्ये आता बऱ्याच मोठ्या भारतीय स्टार्सनेही रेहानाला पाठिंबा दर्शविला तर काहींनी म्हटले की ही भारताचे अंतर्गत प्रकरण आहे, यात हस्तक्षेप करू नये. माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिला हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला.

ओझाने ट्विट करत म्हटले की, “माझ्या देशाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे आणि ते किती महत्वाचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, मला विश्वास आहे की लवकरच हे प्रकरण मार्गी लागेल. आमच्या अंतर्गत प्रकरणात बाहेरील व्यक्तीला नाक खुपसण्याची गरज नाही.” शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर हरियाणाच्या अनेक जिल्ह्यांत इंटरनेटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.

32 वर्षीय रिहाना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी आंतरराष्ट्रीय स्तराची पहिली स्टार आहे. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिंर देखील ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’ म्हणत असं खरमरीत प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिला आहे. कंगनाच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!