मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावा असे परिपत्रक राज्य सरकारने काढले होते. हा निर्णय संविधानाला खीळ बसवणारा असल्याची टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्रीची शान आहे, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेकदिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही. कारण भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला. सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील, अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, अशी मागणी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- राष्ट्रपतींचे ट्विट हटवल्याने ‘या’ देशात ट्विटरवर बंदी, भारतासोबतही ट्विटरचा वाद सुरू
- बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा; आ.मेटेंसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल
- ‘मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्याने देशात कोरोनाचे संकट गडद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

