Share

डिझेल दरवाढीच्या विरोधात ट्रॉन्सपोर्ट असोसिएशनने पाळला काळा दिवस 

Published On: 

औरंंगाबाद : डिझेल दरवाढ आणि सरकारच्या उदासिनेतेच्या विरोधात सोमवारी (दि. २८) रोजी औरंगाबाद ट्रॉन्सपोर्ट असोसिएशनने काळा दिवस पाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. काळा दिवस पाळून औरंगाबाद शहर आणि जिल्हयातील ट्रॉन्सपोर्ट मालक चालक यांनी हे आंदोलन आप-आपल्या स्तरावर शांततेत केले असल्याचे औरंगाबाद गुडस ट्रॉन्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले आहे.

डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ट्रॉन्सपोर्ट क्षेत्राची परिस्थिती बिघडली आहे. याचा परिणाम भारतातील जवळपास २० कोटी ट्रॉन्सपोर्ट व्यवसायींकावर होत आहे. डिझेलच्या वाढत्या किंमती व ट्रॉन्सपोर्ट परिवाराची वाईट अवस्था या प्रती सरकारचे उदासिन धोरण आहे. त्यामुळे २८ जून रोजी काळा दिवस पाळण्यात आला.

यावेळी डिझेल, पेट्रोल उत्पादन शुल्क आणि व्हॅट शुल्क कमी करा, डिझेल, पेट्रोलवर जीएसटी लागू करा, ईएमआय मध्ये मोरॅटोरियम करण्यात यावे, ई वे बिलची मुदत १०० किलोमीटर ला एक दिवस करा, रोड क्षेत्रातील प्रलंबित मुद्दे निकाली काढावे,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर सरकारने सकारात्मक निर्णय नाही घेतला तर ऑल इंडिया मोटार ट्रॉन्सपोर्ट  सरकारला ३० दिवसाची नोटीस देऊन राष्ट्रव्यापी चक्का जामची घोषणा करणार असल्याचा इशारा ट्रान्सपा्ेर्ट असोसिएशनने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!