अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
पोटाला चिमटा काढून वडिलांनी शिकवलं, ‘त्याने’ उपजिल्हाधिकारी होवून ‘फादर्स डे’चं गिफ्ट दिलं
राज्यमंत्री कडू यांनी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथे भेट देऊन नियोजित जागेची पाहणी केली. आमदार राजकुमार पटेल, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री कडू म्हणाले, प्रकल्पात हाऊसबोट, पर्यटक निवास, पदभ्रमण मार्ग, विविध पॉईंटस, पर्यटकांसाठी इतर सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळणार आहे. हे क्षेत्र अचलपूर तालुक्यातील नंदनवन ठरावे, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी यावेळी दिले.
रणरागिणी : गर्भवती महिलेने दिली अंधश्रद्धांना मुठमाती, भाजी-फळे चिरत ग्रहणही पाहिले
प्रकल्पात आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी नियोजनानुसार कामे पूर्ण करावीत. प्रत्येक काम दर्जेदार झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

