सांगली : ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत. गर्भवती महिलांच्या बाबतीत तर ग्रहणाच्या अजूनच अंधश्रद्धा ऐकायला मिळतात.
मोदींविरोधात राहुल गांधींनी अपमानास्पद शब्दांचा वापर केला, तसा शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत
मात्र, आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात समृद्धी जाधव या गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या सुरु असलेल्या ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे. या महिलेने ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळं पानं तोडणं, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या. तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतला. समृद्धी चंदन जाधव असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी ग्रहणाच्या काळात अंधश्रद्धेतून निषिद्ध ठरवलेल्या अनेक दैनंदिन कृती करुन या अंधश्रद्धा झुगारल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांचे नावच राहुल गांधींनी टाकले बदलून, म्हणाले हे तर ‘सरेंडर मोदी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी समृद्धी जाधव म्हणाल्या, “आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे आणि माझ्या कुटुंबाचं प्रबोधन केलं. त्यानंतर आम्ही हे धाडसी पाऊल टाकलं. माझ्या कुटुंबीयांनीही मला यात साथ दिली. सासूबाई सिंधुताई जाधव, चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिलं.” अशात अंधश्रद्धांना मुठमाती देणाऱ्या या रणरागिणीचे खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला पाहिजे.


