नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
कोरोनावर मात करायची असेल तर नियमित योगा करा – नवनीत राणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.
अशात नाशिक मध्ये एका जिगरबाज जिद्दी मुलाची गोष्ट आहे. त्याचे वडिल ‘एसटी’मध्ये मॅकेनिक आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर पोटाला चिमटा घेत पैसे खर्च केले. तो सुद्धा हुशार होताच. मात्र फक्त हुशार नव्हता, त्याच्याकडे आत्मविश्वास होता. त्याने बालपणीच अधिकारी व्हायचय हे ठरवले होते. मग तो भरकटला नाही. पहिल्याच प्रयत्नात, चोविसाव्या वर्षीच उपजिल्हाधिकारी झाला. त्याचे नाव आहे शुभम राजेश मदाने.
जव्हार- मोखाडा येथे वास्तव्यास असणाऱ्या शुभम या 24 वर्षीय युवकाने महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचा पहिल्यांदाच फॉर्म भरला. त्यात त्याने उत्तुंग भरारी घेतली आहे. बालपणापासूनच तो हुशार होता. राज्य परिवहन महामंडळात मॅकेनिक असलेल्या राजेश मदाने यांनाही आपले अर्धवट राहिलेले स्वप्न शुभम पुर्ण करेल असा विश्वास होता. त्यामुळे वडीलांनी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला सारत मुलाच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा घेत पैसा खर्च केला. शुभमने चौथीत असल्यापासूनच इतिहास, भुगोल या विषयांच्या अभ्यासाला सुरूवात केली होती. यावयातच त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. त्यासाठी नियमित सराव सुरु केला. दहावीला 94 टक्के गुण मिळाले. त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बीएसस्सीला 84 टक्के गुण प्राप्त केले.
पदवीचे शिक्षणसुरु असतांनाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी व अभ्यासाला सुरूवात केली होती. गेल्या तीन वर्षांपासूनच अभ्यास करताना राज्यसेवेची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याने घवघवीत यश मिळवित यशाला गवसणी घातली. आई-वडीलांचे शिक्षण कमी असल्याने त्यांनी मुलांच्या भवितव्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवली, मात्र हे करीत असतानाच शुभमच्या यशामुळे त्यांनी केलेल्या कष्टाचे चिज झाले. केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले, असे राजेश मदाने यांनी सांगितले.
मोदींविरोधात राहुल गांधींनी अपमानास्पद शब्दांचा वापर केला, तसा शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत
दरम्यान, जव्हार, मोखाडा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभम मदने यांचे वडील एसटी महामंडळात मेकॅनिकलचे काम करतात. आई गृहिणी तर वडिलांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वडिलांनी पैशांचा कुठलाही विचार न करता आमच्या शिक्षणासाठी लागेल तो खर्च केला. वडिलांचे शिक्षण कमी असल्याने शिक्षणाविषयी इच्छा अपूर्ण राहिल्याने मनात खंत राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी मी सलग अठरा तास अभ्यास करून हे यश मिळवले. गेल्या तीन वर्षांपासून ‘यूपीएससी’चा अभ्यास करतानाच राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेचा अर्ज देखील केला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याने यशाला कवेत घेतले. वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद हीच माझी ‘फादर्स डे’निमित्त वडिलांना भेट असल्याचे शुभम म्हणाला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

