अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले.
त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून होणारा त्याचा संभाव्य प्रवास टळला आहे. दक्षिण नगर जिल्ह्याऐवजी आज ते कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथून महाराष्ट्रात प्रवेश करील. त्यानंतर सायंकाळी सातारा व वडूज येथे पोचेल. सातारा व वडूज चक्रीवादळाचे केंद्र असेल.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे.
यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती.
चक्रीवादळ मंगळवारी पहाटे विशाखापट्टण किनारपट्टीवरून हैदराबादमार्गे नांदेड, असा प्रवास करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते हैदराबादच्या दक्षिणेला सरकले. त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाला मात्र नांदेड टळल्याने ते दक्षिण नगर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता कमी झाली.
सातारा व वडूज चक्रीवादळाचे केंद्र असल्याने हे अंतर नगर शहरापासून दोनशे किलोमीटर आहे. या वादळाचा प्रभाव चारही दिशांना शंभर किलोमीटरपर्यंतच आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्याला म्हणावा तसा फटका आता वादळाचा बसणार नाही. दरम्यान, येत्या रविवारपासून नगर जिल्ह्यातून पाऊस बंद होईल, गारवा वाढेल व धुके पडायला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- बिहार निवडणुकांसाठी ‘बिस्किटा’नंतर शिवसेनेला मिळालं ‘तुतारी वाजवणाऱ्या मावळ्याचं’ चिन्ह
- नेमकं कोण सरकारसोबत करतंय घातपात? चंद्रकांत पाटलांनी केला गौप्यस्फोट
- खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा- प्रीतम मुंडे
- एकरी २५ हजाराची मदत करा, नाहीतर शेतकऱ्यांसोबत मंत्र्यांच्या दारात दसरा-दिवाळी साजरी करू
- अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

