Share

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट घातक? एम्सचे संचालकांनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. परंतु सध्यस्थिती पाहता राज्यातील ही कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. पण अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

परंतु आता एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, ‘की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा डेटा नाही. यामुळे ही लाट मुलांसाठी किती घात असेल? हे सांगणे अवघड आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, व्हायरसमुळे या लाटा येतात, कारण व्हायरस आपले स्वरूप बदलतो. लॉकडाउनमुळे इंफेक्शन कमी होते. मात्र, लॉकडाउन उघडल्यानंतर इंफेक्शन वाढण्याची शक्यता आणखी वाढते. सध्य स्थितीत, असे कुठलेही तथ्य नाही, की ज्याच्या आधारे, पुढील लाट मुलांसाठीच येईल,’ असे सांगितले जाऊ शकेल.

गुलेरिया म्हणाले, चेन ऑफ ट्रान्समिशन रोखण्यासाठी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेविअर ठेवावे लागेल. आता चिंता, तिसरी लाट केव्हा येणार अथवा येऊ शकते आणि ती मुलांसाठी किती घातक असेल? याची आहे. स्पॅनिश फ्लू, एच1 एन1 मध्येही अशाच लाटा दिसून आल्या होत्या. जेव्हा व्हायरसमध्ये बदल होतो, तेव्हा लाट दिसून येते. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचे मत होते, की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळे मुलांचे पालक चिंतीत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही लाट लहान मुलांसाठी जास्त धोकादायक ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. याचदरम्यान केंद्र सरकारनेही लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि नागरिकांना सावध केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!