🕒 1 min read
मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता परंतू सोमवारपासून राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यानंतर मंगळवारी राज्यातील बाधितांचा आकडा वाढल्याचे दिसत आले. दरम्यान, राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या मृत्यूंच्या संख्येच्या तुलनेत बळींच्या संख्येत वाढ होऊन २९५ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे.
यासह आज १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २०८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०७ ने वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर विद्यापीठाने संघटनांच्या आक्षेपानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जागा बदलली!
- देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
- औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत
- ‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
