🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : सिडनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आयोजनावर शंका निर्माण झाली होती. सिडनीतील कसोटी सामना इतरत्र हलविण्याची तयारी देखील सुरु झाली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार सिडनीतील परिस्थती नियंत्रणात आहे.
त्यामुळे सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात सिडनीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. त्यामुळे सिडनीतील सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
याबाबत बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले म्हणाले, “आम्ही गेल्या आठवडाभर परिस्थितीचा सतत आढावा घेत होतो. देशातील सगळे नियम लक्षात घेऊन आणि स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून आम्ही तिसरा सामना सिडनीतच खेळविण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत आम्ही अतिशय सुरक्षित वातावरणात सामने खेळवले आहेत आणि मला खात्री आहे की सगळ्या नियमांचे पालन करून सिडनीतील तिसरा सामना आणि ब्रिस्बेन मधील चौथा सामना सुद्धा सुरक्षित वातावरणात पार पडेल.”
JUST IN: The SCG has been confirmed as the venue for the third #AUSvIND Test
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- ‘गंगूबाई कठियावाडी’ चित्रपटाच्या मागे वादाचा ससेमिरा सुरूच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
